उल्हासनगरात शिवसेनेच्या ( शिंदे गट ) शाखा प्रमुखाची हत्या

 उल्हासनगरात शिवसेनेच्या ( शिंदे गट ) शाखा प्रमुखाची हत्या

उल्हासनगर दि.27( एमएमसी न्यूज नेटवर्क): उल्हासनगर शहरात खरोखरच गुन्हेगारीला ऊत आला असुन दररोज गंभीर गुन्हे घडत आहेत . काल रात्री कॅंप ५ येथिल जयजनता कॉलनीत मटक्याचा अड्डा चालवणाऱ्या व शिवसेनेचा ( शिंदे गट) शाखा प्रमुख असलेल्या शाब्बीर शेख ची चॉपर ने निर्घुण हत्या करण्यात आल्याचा व्हिडियो सोशल माध्यमावर व्हॉयरल झाला आहे . तर हत्या करताना चे सी सी फुटेज समोर आले असुन विक्रम कोटनकर या दुसऱ्या मटक्यावाल्याने ही हत्या केल्याचा संशय पोलिसानी व्यक्त केला आहे .

उल्हासनगर कॅंप ५ येथिल जय जनता कॉलनी मध्ये शिवसेना ( शिंदे ) गटाचा शाखाप्रमुख शाब्बीर शेख हा मटक्याचा धंदा करत होता . त्याच्या मटक्या मुळे परिसरातील नागरिक त्रस्त होते . दरम्यान दोन ते तीन महिन्यापुर्वीच सदर मटक्याचा धंदा शिवसेनेच्या ( ठाकरे गट ) रणरागिणी जया तेजीसह काही महिलानी तोडला होता .तर हिल लाईन पोलिसानी या महिलांवर च गुन्हा दाखल केला होता . तेव्हा पासुन शाब्बीर शेख चा मटक्याचा धंदा बिनबोभट सुरु होता.

दरम्यान काल रात्री बाराच्या आसपास शाब्बिर शेख याच्या मटक्याच्या अड्ड्यावर सात ते आठ तरुणानी शिरुन शाब्बिर शेख यांच्यावर चॉपर ने जबर वार करुन हत्या केली आहे .ही हत्येची माहीती मिळताच सहायक पोलिस आयुक्त मोतीचंद राठोड , मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड , अंबरनाथ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कोते . हिल लाईन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित डेरे हे घटनास्थळी दाखल झाले . त्यानी जखमी शाब्बिर ला मध्यवर्ती रुग्णालयात नेले असता डॉक्टरानी त्याला मृत घोषीत केले . तेथेच मृतदेहाचा पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी शवाग्रहात पाठवले. दरम्यान हत्या करतानाचे सी सी फुटेज समोर आले असुन पोलिस याच सी सी फुटेज च्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.

त्यातच विक्रम कोटनकर या मटकेवाल्याने हत्या केल्याचा संशय पोलिसानी व्यक्त केला आहे . दरम्यान आरोपीना पकडण्यासाठी हिल लाईन पोलिसांचे पथक व उल्हासनगर क्राईम ब्रॅंच चे पथक हे दोन्ही पथके रवाना झाले आहेत . तर या गुंह्याचा पुढील तपास हिल लाईन पोलिस करत आहेत.

SW/KA/SL

27 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *