शिवसेना नेते अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास CBI कडे

 शिवसेना नेते अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास CBI कडे

मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना उबाठा गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आलेला आहे. या प्रकरणात घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी यांनी केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं स्वीकारली आहे. मुंबई पोलिसांनी तपासात केलेल्या त्रुटी दखलपात्र असल्यानं न्यायालयानं म्हटलं. घटनेचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. न्यायालयाचा आदेश पोलिसांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. न्यायमूर्तींनी सुनावणीदरम्यान तपासातील त्रुटींची दखल घेतली. फेब्रुवारी २०२४ मध्ये एका फेसबुक लाईव्ह दरम्यान घोसाळकर यांची हत्या झाली. त्यांची हत्या केल्यानंतर आरोपी मॉरिस नोरोन्हानं स्वत:वर गोळीबार करत आत्महत्या केली.

मुंबई पोलिसांनी तपासात केलेल्या त्रुटी या दखलपात्र असल्याचे म्हणत कोर्टाने घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयने करण्याचे निर्देश दिले आहेत. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास मुंबई पोलिसांनी गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता.मात्र पोलिसांवर राजकीय दबाव असून तपास योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोप करत घोसाळकर कुटुंबियांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर कोर्टाने निर्णय देत आता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं आहे.

तेजस्वी घोसाळकर यांनी हत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून घ्यावा अशी मागणी करत आपल्या याचिकेत अनेक गंभीर दावे केलेहोते. अभिषेक यांच्या हत्येचा कट रचणारे खरे सूत्रधार अजूनही मोकाट आहेत. अभिषेक यांच्या हत्येच्या कटातील मुख्य आरोपी वसूत्रधारांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने पोलिसांनी गांभीर्याने तपास केला नाही. त्यामुळे सूत्रधार मोकाट आहेत. पोलिसांनी घाईघाईत आरोपपत्र दाखल केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

SL/ML/SL

6 Sept 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *