शिवसेना आमचीच !

 शिवसेना आमचीच !

नवी दिल्ली, दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह कोणाचे यावर आज सर्व कागदपत्र सादर झाल्यावर निवडणूक आयोगासमोर प्रथमच दोन्ही पक्षांकडून  शिवसेना आमचीच असा दावा करण्यात आला. ठाकरे गटाकडून ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल आणि शिंदे गटाकडून ज्येष्ठ विधीज्ञ महेश जेठमलानी, मनींदर सिंग यांनी युक्तीवाद केला. सुनावणीपूर्वी शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगात प्रतिज्ञापत्रांच्या 4 मोठ्या बॅगा आणल्या. दोन्ही गटाकडून लाखो प्रतिज्ञापत्र, पुरावे दिली गेली.

निवडणूक आयोगातील सुनावणी 35 मिनिटे चालली. दोन्ही गटांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. यावेळी खासदार संजय राऊत तसेच दिल्लीतील ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. आता निर्णय काय आणि कधी येणार याकडे लक्ष लागले आहे.

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

  • केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी प्राथमिक की अंतीम हे स्पष्ट करा. यावर निवडणूक आयोगाने आत्ताच सांगता येणार नाही, असे उत्तर दिले.
  • सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत आयोगात सुनावणी नको.
  • शिंदे गटाची सादर कागदपत्रे बोगस.

शिंदे गटाचे वकील जेठमलानी यांचा युक्तिवाद

  • शिंदे गटाकडे आमदार, खासदारांचे बहुमत. धनुष्यबाण चिन्हासाठी बहुमत महत्वाचे ते आमच्याकडे आहे.
  • शिंदे गटाची रचना शिवसेनेच्या घटनेनुसारच.
  • शिवसेनेची जुनी घटना बाळासाहेब ठाकरेंवर केंद्रीत होती. बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी घटनेत केलेला बदल बोगस
  • उद्धव ठाकरेंकडे असलेले शिवसेना पक्षप्रमुख बेकायदेशीर..
  • राष्ट्रीय कार्यकारणीत जुलै 2022 मध्ये एकनाथ शिंदेंची मुख्यनेता म्हणून निवड करण्यात आली होती. शिंदेंच्या निवडीमुळे ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाला अर्थ नाही.
  • उद्धव ठाकरेंकडून पक्षप्रमुख पद निर्माण करणे बेकायदेशीर होते. शिंदे गट हीच खरी शिवसेना, 2018 मध्ये उद्धव ठाकरेंनी पक्षांतर्गत निवडणूक न घेताच पक्षप्रमुख स्वतःकडे ठेवले.
दरम्यान दोन्ही गटांकडून निवडणूक आयोगासमोर आपला पक्ष आणि पक्ष चिन्हावरील हक्क सिद्ध करण्यासाठी लाखोंच्या संख्येने कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. या साऱ्या घडामोडींनंतर  ‘शिवसेना’ हे पक्षाचं नाव कुणाकडे राहणार. पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण कुणाला मिळणार याबाबत केंद्रीय निवडणूक आयोग काय निकाल देणार आणि कधी निकाल देणार याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागून राहीले आहे.
SL/KA/SL
10 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *