शिवसेना- भक्ती शक्ती संवाद यात्रेतून वारकऱ्यांशी संवाद !

 शिवसेना- भक्ती शक्ती संवाद यात्रेतून वारकऱ्यांशी संवाद !

सोलापूर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंढरपूर क्षेत्र संतांचे माहेर म्हणून ओळखले जाते. याच माहेरात महाराष्ट्राला नव्हे तर सबंध विश्वाला दिशा दर्शवणारे संत होऊन गेले. संतांचे वंशज आणि पंढरपुरातील वारकरी सांप्रदायातील फड प्रमुख, बडवे , उत्पात समाज प्रमुख, अखिल वारकरी भाविक मंडळ, वारकरी पाईक संघ, सेवा धारी कर्मचारी वर्ग, हिंदुत्ववादी संघटना यांच्या प्रमुखांशी संवाद साधला.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वासकर फडाचे प्रमुख देवव्रत उर्फ राणामहाराज वासकर हे होते. उपस्थित महाराजांच्या हस्ते संवाद यात्रेला आशीर्वाद आणि शुभेछा प्रदान करण्यात आल्या.

उपस्थितांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली. तीर्थक्षेत्रांचा विकास साहेबांच्या काळात अधिक गतीने होतो याबद्दल सर्वच ज्येष्ठांनी आनंद व्यक्त केला असे यावेळी सांगण्यात आले . अशा प्रकारची भक्ती शक्ती संवाद यात्रा काढून मुख्यमंत्र्यांना हिंदू धर्माविषयी असणारा अभिमान , तळमळ दिसून आली. वारकऱ्यांच्या हिताचे सर्वाधिक निर्णय शिंदे सरकारच्या काळात घेण्यात आले असे मत देखील यांवेळी अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.

पंढरपूर तीर्थक्षेत्राकरता केवळ निधीची घोषणा नाही तर प्रत्यक्षात कोट्यावधी रुपयांचा निधी येऊन काम देखील सुरू झाले अशा गतिशील मुख्यमंत्र्यांचे कौतुक सगळ्यांनी केले व पांडुरंगाचे आशीर्वादाने ही संवाद यात्रा महाराष्ट्रात क्रांती घडवेल विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. बैठकीनंतर प्रश्न उत्तर सत्रा मध्ये उपस्थित प्रश्न आणि समस्या समजून घेत त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याची अभिवचन यावेळी उपस्थितांना शिवसेना भक्ती सेनेच्या वतीने दिले.

ML/KA/SL

25 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *