आगामी सर्व निवडणूका शिवसंग्राम भाजपा सोबतच लढवणार

 आगामी सर्व निवडणूका शिवसंग्राम भाजपा सोबतच लढवणार

मुंबई दि.21( एम एमसी न्यूज नेटवर्क): २०१४ पासून शिवसंग्राम भाजपा सोबत घटक पक्ष म्हणून कार्यरत आहे .आगामी सर्व निवडणूका शिवसंग्राम भाजपा सोबतच लढवणार आहे,अशी माहिती शिवसंग्राम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, सध्या होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका देखील शिवसंग्राम सर्व ताकदीणीशी लढणार आहे. शिवसंग्राम प्रणीत स्थापन असलेला ‘भारतीय संग्राम परिषद’ या पक्षाच्या माध्यमातून या सर्व निवडणूका लढविल्या जाणार आहे.Shiv Sangram will fight all upcoming elections with BJP

शिवसंग्रामचे संस्थापक स्वर्गीय विनायकरावजी मेटे यांचे अपघाती निधनानंतर त्यांचे अधुरे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. असे सांगून शिंदे म्हणाले की, येत्या ६ जानेवारीला शिवसंग्रामच्या स्थापनेला २० वर्षे पुर्ण होत आहेत. शिवसंग्रामच्या वर्धापन दिनानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात विविध कार्यक्रम व राज्य पातळीवर देखील एका भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. १ डिसेंबर २०२२ पासून शिवसंग्रामचे अध्यक्ष व अन्य नेते, प्रमुख पदाधिकारी शिवसंग्रामच्या प्रचार व बांधणीसाठी राज्य भर दौरे करणार आहेत.Shiv Sangram will fight all upcoming elections with BJP

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी शिवसंग्रामकडून लढा उभा केला जाईल, छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्मारक मुंबई येथील आरबी समुद्रात उभारण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल, ६५ वर्षावरील शेतकऱ्यांना दरमहा ५ हजार रुपये पेन्शन शासनाने दिली पाहीजे, भूमीपूत्रांना योग्य न्याय देण्यासाठी स्थानिक भूमिपुत्रांना कारखान्यात कामाची हमी देण्यासाठी शासनाने योग्य तो कायदा करावा, महिलांना सर्व क्षेत्रात आरक्षण व संरक्षण मिळावे तसेच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर शिवसंग्रामची विद्यार्थी आघाडी प्रभावीपणे कार्य करेल. महाराष्ट्रातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी आंदोलन उभारले जाईल. इत्यादी मागण्यासाठी शिवसंग्राम आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी महाराष्ट्र सरकार कडे प्रयत्न करणार आहेत.असे शिंदे म्हणाले.

ML/KA/PGB
21 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *