प्रतापगडावर साकारणार शिवप्रताप स्मारक
मुंबई,दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नुकताच साजरा झालेल्या शिवप्रताप दिनी प्रतापगडावरील अफझलखानाच्या कबरीवरील अनधिकृत बांधकाम हटवण्यात आल्याने शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण असताना राज्य सरकारने आज एक महत्त्वाची घोषणा केली आहे. आता प्रतापगडावर शिवप्रताप स्मारक साकारले जाणार आहे.Shiv Pratap memorial will be constructed at Pratapgad
शिवभक्तांच्या मागणीला लक्षात घेऊन, किल्ले प्रतापगड परिसरात छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यावर चाल करुन आलेल्या अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा आणि लाईट व साउंड शो सुरु करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तात्काळ प्रस्ताव मागविण्यात यावा, असा आदेश पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिला आहे.
यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत, या पार्श्वभूमीवर प्रतापगडावर शिवप्रताप स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी विविध संघटनांकडून करण्यात येत होती.
SL/KA/SL
15 Nov.2022