आग्रा येथील ‘त्या’ ऐतिहासिक किल्ल्यात साजरी होणार शिवजयंती, विकी कौशल येणार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बुधवारी आग्रा येथील जहाँगीर महाल या ऐतिहासिक स्थळी यंदा शिवजयंतीचा विशेष कार्यक्रम घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम साजरा करण्याचे हे तिसरे वर्ष आहे. बुधवारी संध्याकाळी ६ वाजता आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. शिवाय नुकताच प्रदर्शित झालेला ‘छावा’ चित्रपटातील छत्रपती संभाजीराजेंची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल हा प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहणार आहे.