शिवसेना महिला आघाडीचे शिवदुर्गा महिला संमेलन ९ मार्चला मुंबईत

 शिवसेना महिला आघाडीचे शिवदुर्गा महिला संमेलन ९ मार्चला मुंबईत

मुंबई, दि.५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतिक महिला दिनाच्या सोबत १० मार्च रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने शिवदुर्गा महिला संमेलनाचे आयोजन शिवसेनेच्या महिला आघाडीने केले असून त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संबोधित करणार आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांनी नुकतेच भूमिका मांडली की महिलांचे सन्मान म्हणजेच महिलांचा अधिकार आणि त्या दृष्टिकोनातून एक वेगळा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम आम्ही घेत आहोत असे विधानरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉ नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. शिवसेना महिला आघाडीच्या वतीने दिनांक ९ मार्च २०२४ रोजी संध्याकाळी ५ ते ९ या दरम्यान शिवदुर्गा महिला संमेलनाचे आयोजन षण्मुखानंद सभागृह सायन मुंबई येथे केलेले आहे.

महिला मतदारांना लागणाऱ्या नागरिक सुविधा, त्याचे आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण, महिलांची सुरक्षितता यासाठी सरकारने जे प्रयत्न केले त्याची माहिती देणे हा एक या संमेलनाचा हेतू आहे. त्यासोबत स्त्रियांच्या अडचणीमध्ये व नैसर्गिक आपत्तीमध्ये शिवसेनेने सातत्याने मदत कार्य केलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर या मदतीचा फायदा होत असताना आरोग्य विषयक सेवा, महिला बचत गट, त्याचबरोबर लेक लाडकी योजना, मातृत्व वंदन योजना,आनंदाचा शिधा योजना, वयोश्री योजना,शेतकरी महिलांसाठी म्हणून उभारी या सारख्या उत्तर महाराष्ट्रात राबवलेल्या योजना, मुलींच्या साठी उच्चतंत्र शिक्षणामध्ये फी माफी करणे असे अनेक निर्णय राज्य सरकारने घेतलेले आहेत. असे डॉ गोऱ्हे यांनी सांगितले.

त्याचबरोबर चौथ्या महिला धोरणाला सुद्धा वेग देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर या सगळ्या योजना सामान्य महिलांपर्यंत पोहोचवणं हे या संमेलनाच्या मधला एक मुख्य हेतू आहे. या दृष्टिकोनातून महिला कार्यकर्त्यांनी केलेल्या कामातील तसेच महिला लोकप्रतिनिधींच्या कामातील यशोगाथा संमेलनात मांडल्या जातील. त्यासोबत शिवसेना महिला आघाडीचे कार्य आणि त्याला सामोरे जात असताना प्रयत्नांची दिशा यावरही चर्चा होईल.सरकारच्या योजना किंवा विकासाच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी ठिकठीकाणी सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत आपण कसं पोहोचायचं याबद्दल देखील अनुभवी महिला अधिकारी महिलांना मार्गदर्शन करणार आहेत.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या संमेलनाचे संयोजन केले आहे. या संमेलनास स्वतः मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये शिवसेनेच्या सर्व नेते , उपनेते आणि मुंबईच्या महिला विभाग प्रमुख,महिला संपर्कप्रमुख, महिला उपविभाग प्रमुख, विधानसभा संपर्कप्रमुख तसेच शिवसेनेच्या पदाधिकारी यांचा चांगल्या प्रकारचा महत्त्वाचा सहभाग आहे. मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे डॉ अमोल शिंदे आणि श्री गजानन पाटील या कार्यक्रमाला लागणारी माहिती देणार आहेत.

ML/KA/SL
5 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *