बृहन्‍मुंबई महानगरपालिका शिक्षण समिती अध्यक्षपदी राजेश्री शिरवडकर यांची बिनविरोध निवड

 बृहन्‍मुंबई महानगरपालिका शिक्षण समिती अध्यक्षपदी राजेश्री शिरवडकर यांची बिनविरोध निवड

मुंबई, दि १९
बृहन्‍मुंबई महानगरपालिका शिक्षण समिती अध्यक्षपदी श्रीमती राजेश्री राजेश शिरवडकर यांची आज (दिनांक २० फेब्रुवारी २०२६) बिनविरोध निवड करण्‍यात आली. पीठासीन अधिकारी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी या बिनविरोध निवडीची घोषणा केली. 

बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ पार पडल्यानंतर सोमवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी महानगरपालिका विशेष सभेत शिक्षण समितीवर २२ महानगरपालिका सदस्यांची आणि ४ बिगर महानगरपालिका सदस्यांची नामनिर्देशानुसार नियुक्ती करण्यात आली आहे. या वैधानिक समितीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याकरिता आज (दिनांक २० फेब्रुवारी २०२६) सकाळी ११.०० वाजता विशेष सभेचे आयोजन करण्‍यात आले होते.

शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी श्रीमती राजेश्री राजेश शिरवडकर यांचा एकमेव अर्ज प्राप्‍त झाल्‍याने त्‍यांची बिनविरोध निवड झाल्‍याचे पीठासीन अधिकारी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी जाहीर केले.
उप आयुक्‍त (शिक्षण) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर, महानगरपालिका सचिव श्रीमती मंजिरी देशपांडे यांच्‍यासह शिक्षण समिती सदस्‍य यावेळी उपस्थित होते.KK/ML/MS  

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *