रोड शो दरम्यान शिंदे – ठाकरे गट आमने सामने, प्रचंड घोषणाबाजी
नाशिक, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा पाचवा टप्पा सुरु आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा हा शेवटचा टप्पा आहे. प्रचारासाठी दोन दिवस राहिले आहेत. यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा आणि रोड शो केले जात आहे. नाशिकमध्ये शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे आणि भाजप उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये रोड शोसाठी दाखल झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो सुरु असताना शिंदे गट- ठाकरे गट आमने सामने आले. ठाकरे गटाकडून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबाणचा इशारा करुन ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना उत्तर दिले.
प्रचंड पोलीस बंदोबस्तामुळे मुख्यमंत्र्यांचा रोड शो सुरळीत पार पडला. यावेळी ठाकरे गटाचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत होते. पोलिसांनी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना पुढे जाऊ दिले नाही. यामुळे पुढील अनर्थ टळला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रोड शो मध्ये पालकमंत्री दादा भुसे बाईकवर होते. मुख्यमंत्र्यांच्या रोड शो चा मार्ग मोकळा करण्यासाठी मंत्री दादा भुसे यांनी बाईकवर प्रवास केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचार रथासमोर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यात ”50 खोके एकदम ओके”ची घोषणा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दिल्या. Shinde – Thackeray group face to face during road show, fierce declaration
ML/ML/PGB
16 May 2024