शिंदे एक तर फडणवीस दोन क्रमांकावर , लोकप्रियतेची जोरदार चर्चा

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात एकनाथ शिंदे अशा आज वर्तमापत्राद्वारे प्रसिध्द केलेल्या शिवसेनेच्या जाहिरातीत देवेंद्र फडणवीस हे शिंदे यांच्या पेक्षा दुसऱ्या क्रमांकाचे प्रसिद्ध नेते दाखवल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

आज शिवसेनेच्या वतीने राज्यातील बहुतांश वर्तमान पत्रातून नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र असलेली जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यात मोदी हे देशात सर्वात लोकप्रिय आणि राज्यात एकनाथ शिंदे हे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून दाखवण्यात आले आहेत.

मात्र त्याखाली मुख्यमंत्री म्हणून लोकप्रियतेच्या बाबतीत शिंदे यांना २६ टक्के तर फडणवीस यांना २३ टक्के लोकांनी पसंत केल्याचाही उल्लेख जाहिराती मध्ये आहे. याचीच जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात असून हा शिवसेना आणि भाजप मधील अंतर्गत संघर्षातून आलेला विषय आहे की भाजपाच्या वरिष्ठांकडून खेळली गेलेली खेळी आहे याचा अंदाज बांधण्याची कसरत सुरू आहे.

या जाहिरातीतून कल्याण आणि ठाण्याच्या लोकसभा मतदारसंघाबाबत सुरू असलेला दोन्ही पक्षातील अंतर्गत संघर्ष , त्यावरून दोन्ही पक्षात सुरू झालेली आरोप प्रत्यारोपांची मालिका याचे प्रतिबिंब पडले आहे का, त्यासोबतच भाजपाच्या वरिष्ठांकडून फडणवीसांचे पंख छाटण्याचे प्रयत्न होत आहेत का असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या जाहिरातीत बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र देखील नसल्याने ती जाहिरात वादग्रस्त ठरली आहे, खा संजय राऊत यांनी देखील याच मुद्द्यावरून शिंदे यांची कोंडी केली आहे.Shinde at number one and Fadnavis at number two, hot talk of popularity

ML/KA/PGB
13 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *