भारताचे संविधान सर्वोत्तम, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
नागपूर, दि २६ : भारताचे संविधान हे जगातील सर्वात उत्कृष्ट आणि प्रगत संविधान असून त्याच्या आधारेच देशाचा कारभार चालतो. संविधान दिन साजरा करण्याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असून त्यांचे अभिनंदन करावे लागेल. काही जण लाल कोऱ्या पुस्तकाच्या आधारे संविधानाचा अपमान करण्याचा प्रयत्न करतात त्यांनी त्यातून बोध घ्यावा, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता केली.
26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा काळा दिवस असा उल्लेख करताना त्यांनी शहीद जवानांना आणि निर्दोष नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
नगरपालिका निवडणुकांच्या प्रचार दौऱ्यानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
विदर्भातील प्रचाराबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, गेल्या दोन दिवसांपासून मी विदर्भात प्रचार करत असून प्रत्येक सभेत प्रचंड उत्साह दिसत आहे, विशेषतः महिलांचा सहभाग उल्लेखनीय आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये विकास हा मुख्य अजेंडा असल्याचे सांगत त्यांनी रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, उद्याने आदींसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आल्याची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक नगरपरिषदेला नमो उद्यान विकसित करण्यासाठी 1 कोटी रुपये देण्यात आले असून तो निधी प्रत्यक्ष पोहोचत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना शिंदे म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना ही योजना सुरू केली असून कितीही अडथळे आले तरी ती सुरूच राहणार आहे आणि महिलांना योग्य तो लाभ मिळणार आहे. मोठ्या शहरांसोबतच छोट्या शहरांचाही विकास होईल, विकास आराखडे मंजूर होतील आणि निधीही उपलब्ध होईल याची हमी देखील उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.KK/ML/MS