अष्टपैलू शिक्षक नितिन आहेर जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित !!!
मोखाडा, दि ३०
अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले प्राथमिक शिक्षक नितीन आहेर यांना जिल्हा परिषद पालघर च्या वतीने मोखाडा तालुक्यातुन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे व शिक्षणाधिकारी सोनाली मातेर,जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष चौधरी याच्या हस्ते गोवर्धन इको व्हिलेज गालतरे वाडा येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी त्यांची आई कमलबाई वामन आहेर,पत्नी माधुरी आहेर,मुलगा साईदिप व साडु योगेशराव कानकाटे त्यांच्या समवेत पुरस्कार स्विकारताना होते.
नितिन आहेर यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्य उत्तम असुन ते पालघर जिल्ह्यात उत्तम वक्ता, सुत्रसंचालक,शिवव्याख्याते, गायक,प्रबोधनकार म्हणुन सुप्रसिद्ध आहेत. त्यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याने राजकीय,शैक्षणिक,सहकारी,अभियंत्रिकी,वैद्यकिय या सर्वच क्षेत्रातून समाधान व्यक्त केले जात असून त्यांना भावी वाटचालीसाठी सर्वच क्षेत्रातुन शुभेच्छा दिल्या जात आहे.JS/ML/MS