नेत्र चिकित्सा शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद
मुंबई, दि. दि २३
शिवसेनेचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या सहकार्याने प्रभादेवी सुंदर नगर येथे मोफत नेत्र तपासणी शिबीरचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये नागरिकांच्या संपूर्ण डोळ्याची मोफत तपासणी करून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले
आम्ही विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्य विषयक तसेच सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करत असतो. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज या ठिकाणी नेतृत्व शिबिराचे आयोजन केले असून पुढच्या महिन्यात आम्ही आरोग्य शिबिराचे देखील आयोजन करणार असल्याची माहिती शिवसेनेचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी दिली. या शिबिराला यशस्वी करण्यासाठी सर्व टीम आणि डॉक्टर यांनी विशेष मेहनत घेतली. या शिबिरात शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, स्थानिक, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.KK/ML/MS