शिवसेना सहसचिव एकनाथ शेलार यांनी केली पूरग्रस्तांना पाच लाखाची मदत
मुंबई, दि ३
शिवसेना सहसचिव एकनाथ शेलार यांनी उपमुख्यमंत्री,शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना मराठवाड्यातील पूरग्रस्तांना जेवढी होईल तेवढी मदत करण्याबाबत केलेल्या आवाहनानुसार पाच लाखाचा धनादेश शिवसेना सहायता निधीला सुपूर्द केला. मी एक शोधा शेतकरी आहे शेतकऱ्यांचे दुःख मी समजू शकतो. मराठवाडा येथे आलेला पूर हा फार भयानक असून फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची नुकसान झाले आहे. काही लोकांचे शेत घरातील भांडीकुंडी जीवन आवश्यक वस्तू देखील या पुरामध्ये वाहून गेले आहे. तर शाळेमध्ये शिकणाऱ्या मुला मुलींचे वह्या पुस्तके दप्तरे आणि शिक्षणा उपयोगी वस्तू देखील या पुरामध्ये खराब झाले आहे. ही वस्तुस्थिती मी स्वतः मराठवाडा येथील गावोगावी जाऊन फिरून पाहिली. त्यानंतर मला खूप वेदना झाल्या आपणही शेतकऱ्यांच्या या वेदना कमी करण्याचा प्रयत्न करावा आणि त्यांना थोडीशी मदत करून त्यांच्या दुःखात सहभागी होऊन खालीच वाटा उचलावा. या दृष्टिकोनातून मी माझे वैयक्तिक पाच लाखाची मदत नुकतीच शिवसेना सहायता निधीमध्ये जमा केली आहे. मी शिवसैनिकांना तसेच महाराष्ट्रातील नागरिकांना आवाहन करतो की आपण देखील शेतकऱ्यांना मदत करावी आणि त्यांच्यासाठी खारीचा वाटा उचलावा जी काही मदत होईल ती आपण त्यांना जरूर करावी असे आवाहन शिवसेनेचे सहसचिव एकनाथ शेलार यांनी केले.KK/ML/MS