झणझणीत खान्देशी शेवभाजी
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
1 वाटी शेव
1 छोटा टॉमेटो
2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
1 कांदा
1 आले तुकडा
4 लासून पाखल्या
2 चमचे सुक खोबर
2 लाल मिरच्या (ऑप्शनल)
1 तमालपत्र
1 चमचा काळा मसाला
1 लाल मिरची
1/2 चमचा हळद
1 चमचा धणे जीरे पावडर
चवी नुसार मीठ
3 मोठे चमचे तेल
चिरलेला कांदा लसुण मिरची आले तमालपत्र आणि खोबरे हे सगळं एका मध्ये सोनेरी होय पर्यन्त परतून घ्यावे.
नंतर त्याचं वाटण मिकसी मध्ये तयार करून घ्या. एका टोपात तेल गरम करा आणि त्यात वाटणं फोडणीला घाला नंतर तेला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे.
नंतर सगळे मसाले टाकून परतून घ्यावे आणि त्या नंतर चवी नुसार मीठ घालून मिक्स करावे नंतर दीड ग्लास पाणी घालून उकळत ठेवा आणि उकळत्या रश्यात वरतून शेव आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून ताबडतोप गरम गरम सर्व्ह करा.
ML/ML/PGB
22 July 2024