महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी असंवेदनशील केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस खासदारांचे ठिय्या आंदोलन

दिल्ली, दि ७
मराठवाड्यातील काही जिल्ह्यात युरिया खताचा तुटवडा जाणवत आहे. शासनाकडे वारंवार मागणी करून देखील खतपुरवठा करण्यात आलेला नाही. जालना जिल्ह्यात बोगस खताचे प्रमाण वाढले आहे. अधिकारी वर्गाला हाताशी धरून कृत्रिमरीत्या खताचा तुटवडा केला जातो त्यामुळे शेतकऱ्यांना चढ्या दराने खत खरेदी करावे लागते.
वेळीच खत उपलब्ध न झाल्याने त्याचा पिकावर परिणाम होतो.
शेतकऱ्यांना सामोरं जावे लागणाऱ्या या संकटाविरोधात आम्ही आक्रमक भूमिका घेतली.
खते आणि रसायन मंत्री जे पी नड्डा यांच्याकडे या प्रश्नासाठी वेळ मागितला.
पण शेतकऱ्यांसाठी वेळ नसलेल्या असंवेदनशील मंत्र्यांनी वेळ न दिल्याने त्यांच्या कार्यालयाबाहेरच काँग्रेस खासदारांनी ठिय्या आंदोलन केले. शेतकऱ्यांना न्याय द्या अशा घोषणा दिल्या, त्यानंतर जागे झालेल्या मंत्र्यांनी खासदारांच्या शिष्टमंडळाला तातडीने भेट देत निवेदन स्वीकारले.
काँग्रेस हे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कटीबद्ध आहे आणि गरज पडली तर मंत्र्याच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करू शकतात हे आज मुंबई काँग्रेस अध्यक्षा आणि खासदार वर्षाताई गायकवाड यांनी दाखवून दिले. KK/ML/MS