श्री तुळजाभवानी देवीची शेषशायी अलंकार महापूजा

 श्री तुळजाभवानी देवीची शेषशायी अलंकार महापूजा

धाराशिव, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शारदीय नवरात्र महोत्सवात आज सहाव्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची शेषशायी अलंकार महापूजा मांडण्यात आली आहे.

श्री तुळजाभवानीच्या आज नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर शेषशायी अलंकार महापूजा मांडण्यात आली.या दिवसाचे महत्व भगवान विष्णू क्षिरसागरामध्ये शेष शैयावरती विश्राम घेत असताना मातेने यांचे नेत्र कमलात जावून विश्राम घेतला.यावेळी भगवान विष्णू यांच्या दोन्ही कानातून निघालेल्या मला (मळ) पासून दोन दैत्य उत्पन्न झाले, त्यांची नावे शुंभ व निशुंभ आहेत.

ते उत्पन्न होताच शेष शैयावरील विष्णूवरती आक्रमण करण्यास जाऊ लागले.त्यावेळी नाभी कमलात विराजमान असलेल्या ब्रम्हदेव यांनी विष्णूच्या नेत्र कमलात विश्राम घेणाऱ्या देवीची स्तुती करुन श्रीस जागविले आणि विष्णूवरती आक्रमण करणाऱ्या दैत्यांचा वध श्री तुळजाभवानी मातेने केला म्हणून विष्णूने आपले शेष शैया श्रीस विश्राम करण्यासाठी दिले त्यामुळे ही शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात येते अशी आख्यायिका सांगितली जाते.

शारदीय नवरात्र महोत्सवात दररोज नियमित श्री तुळजाभवानी देवीचे विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात.यात उद्या 21ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि 22 ऑक्टोबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत.
दरम्यान,काल गुरुवारी रात्री श्री देवीची मयुर वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात आली.

ML/KA/SL

20 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *