6 वर्षीय शिवराजने सर केले कळसूबाईचे शिखर…
बुलडाणा, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील 6 वर्षीय शिवराज ने महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळख असलेल्या कळसूबाईचे शिखर चढून दाखवण्याची किमया साधली आहे. लोणार येथील 6 वर्षीय शिवराज सचिन कापुरे याने याआधी देखील जॉर्ज एवरेस्ट हे शिखर सर केले आहे.
कळसूबाई शिखर सर करताना शिवराज ला खूप मज्जा आली असल्याचं तो सांगतो. वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षी 5427 फूट उंच कळसूबाई शिखर शिवराज ने सर केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. यापुढे जाऊन त्याला आता माउंट एवरेस्ट सर करायचे असल्याचं तो सांगतो.
त्यामुळे भल्याभल्यांना धडकी भरवणारा शिखर ट्रेकिंग चा प्रवास शिवराज ने आपल्या वयाच्या 6 व्या सुरू केलाय.
ML/KA/PGB 22 Dec 2023