माथाडी कामगारांच्या चळवळीमुळे मी राजकारणात मोठा झालो
आमदार शशिकांत शिंदे यांचे प्रतिपादन

 माथाडी कामगारांच्या चळवळीमुळे मी राजकारणात मोठा झालोआमदार शशिकांत शिंदे यांचे प्रतिपादन

मुंबई, दि २३
माथाडी कामगारांचे आराध्यदैवत कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केलेल्या माथाडी कामगार चळवळीमुळेच मी राजकारणात मोठा झाला आणि माझी शरदचंद्रजी पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाली अशी कृतज्ञा माथाडी कामगार नेते, माजी मंत्री, आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन, माथाडी पतपेढी, ग्राहक सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने तमाम माथाडी कामगारांच्यावतिने माथाडी कामगार नेते, माजी मंत्री, आमदार शशिकांत शिंदे यांची शरदचंद्रजी पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माथाडी भवन, नवीमुंबई याठिकाणी आयोजित केलेल्या भव्य सत्कार समारंभात शशिकांत शिंदे बोलत होते, ते पुढे असे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी माझी निवड झाली असली तरीही संघटनेच्या नेत्यांबरोबर समन्वय ठेवून माथाडी कामगारांच्या हितासाठी सातत्याने काम करेन.
कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केलेली ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळ ही स्वतंत्र ताकद आहे, माथाडी कामगारांचे न्याय्य प्रश्न सोडविताना राजकिय परिस्थितीमुळे कोणतीही अडचण येता कामा नये, माथाडी कामगारांचे न्याय प्रश्न सोडविणे, माथाडी कामगार चळवळ अबाधीत ठेवणे यादृष्टीनेच सर्वांनी कार्य करावे, असे सांगून माथाडी कामगार नेते व सरचिटणीस नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी शशिकांत शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल व मनोज जामसुतकर यांना आमदार झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
यावेळी युनियनच्या सेक्रेटरी पदावर कार्यरत असलेले श्री. मनोज जामसुतकर हे महाराष्ट्र विधानसभेचे आमदार झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला, त्यांनी देखिल माथाडी कामगार चळवळीमुळेच मला आमदार हा बहुमान मिळाला अशी प्रतिक्रिया दिली.
यावेळी युनियनचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप व संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, फुट मार्केटच्या व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी नसिम सिध्दिकी यांनी नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे व आमदार मनोज जामसुतकर यांच्या कार्याचा उल्लेख करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख यांनी केले.
नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे व आमदार मनोज जामसुतकर यांना शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि पांडुरंगाची मुर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभास महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, माजी नगरसेवक सुर्यकांत पाटील, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, दिलीप खोंड, रविकांत पाटील, उपाध्यक्ष सुर्यकांत पाटील, कायदेशिर सल्लागार अॅड्. भारतीताई पाटील, खजिनदार गुंगा पाटील, माथाडी पतपेढीचे चेअरमन विठ्ठल धनावडे, माथाडी ग्राहक सोसायटीचे चेअरमन बाजीराव धोंडे, व्यापारी प्रतिनिधी, संस्थांचे अधिकारी-कर्मचारी आणि तमाम माथाडी कामगार उपस्थित होते. KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *