राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा भव्य सत्कार

मुंबई, दि. २१
महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे कार्याध्यक्ष, माजी मंत्री व महाराष्ट्र विधानपरिषदेचे लोकप्रिय आमदार शशिकांत जयवंतराव शिंदेसाहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्रजी पवार गट) च्या “महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष” पदी निवड झाली आहे.शशिकांत जयवंतराव शिंदे यांच्या या निवडीबद्दल त्यांचा तमाम माथाडी कामगारांच्यावतिने मंगळवार दि. २२ जुलै, २०२५ रोजी सायंकाळी ४-०० वाजतां कै. शिवाजीराव पाटील सभागृह, पहिला मजला, माथाडी भवन, प्लॉट नं. १४/अ, सेक्टर नं.१९, तुर्भे, नवीमुंबई याठिकाणी भव्य सत्कार आयोजित केला आहे.*
तरी आपण या भव्य सत्कार समारंभास उपस्थित रहावे, अशी विनंती नरेंद्र अण्णासाहेब पाटील, सरचिटणीस,महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन यांनी केली आहे. KK/ML/MS