भांडवली बाजारासाठी(शेअर मार्केट ) ठरला ऐतिहासिक आठवडा. निफ्टीने १५,७०० चा टप्पा केला पार
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :या आठवड्यात बाजारावरती विदेशी बाजारातील संकेत,कोरोनाच्या रुग्णसंख्येतील सातत्याने होणारी घट,लसीकरण मोहिमेचावेग,जीडीपीचे(GDP) आकडे,आर.बी.आय(RBI) पतधोरण ,वाहन विक्रीचे(AutoSales) आकडे,अमेरिकेतील non-farm payroll data,तिमाही निकाल,. या सगळ्याचा प्रभाव राहिला.या आठवड्यात निफ्टीने पुन्हा नवीन विक्रमी भाव नोंदवला. येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी व दीर्घकाळाकरिताच गुंतवणूक करावी.Markets end marginally lower after Reserve Bank of India maintained status quo and keep its stance accommodative.
निफ्टीचा नवीन विक्रम प्रथमच १५,५०० चा टप्पा पार Nifty hits record high
सोमवारी सकाळी बाजाराची सुरुवात नरम झाली परंतु नंतर तेजीवाल्यानी मार्केटमध्ये जोश भरला सलग दुसऱ्या दिवशी निफ्टीने विक्रमी स्तरावरती कामकाज केले. निफ्टीने प्रथमच १५,५०० चा टप्पा पार केला. फार्मा शेअर्स मध्ये तेजी होती डीवीस लॅब(DIVIS LAB) तसेच बायोकॉन(BIOCON) यांच्या समभागात चांगलीखरेदीझाली. सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला व निफ्टीने नवीन स्तर गाठला त्यासाठी RIL, ICICI BANK, ITC और HDFC BANK या समभागांचे योगदान राहिले. सात वर्षानंतर मे महिना बाजारासाठी उत्तम राहिला ,निफ्टी व सेन्सेक्समध्ये ६.५ % ची वाढ झाली. बाजार बंद होताना सेन्सेक्स ने ५१४ अंकांची वाढ घेऊन ५१,९३७चा बंद दिला व निफ्टीने १४७ अंकांची वाढ घेऊन १५,५८२ चा बंद भाव दिला. सिरम इंस्टिटयूटने(SERUM INSTITUTE )अस्त्राझेनेका वॅक्सीनचे उत्पादन वाढवणार असेजाहीर केले. जून महिन्यात ९ करोडलसीचे उत्पादन करणार असे सांगितले.
Nifty Logs Another Record Close On Longest Stretch Of Gains In Six Months. Markets continue the gaining momentum with Nifty hitting fresh record high of 15,606.35 intraday session supported by the metal, energy and banking stocks.
सोमवारी संध्याकाळी जीडीपीचे आकडे जाहीर झाले,जीडीपी २०२०-२१ या आर्थिक वर्षात उणे ७.३ टक्के जाहीर झाला, हा गेल्या ४० वर्षातला सर्वात कमी दर आहे. कोरोनाने अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. पण जानेवारी ते मार्च या तिमाहीत १.६ टक्के वृद्धीदर थोडा दिलासा देणारा ठरला. GDP contracts after 40 years. GDP contracts 7.3% in FY21; grows at 1.6% in Q4
भारी उतार चढावानंतर मंगळवारी बाजाराचा बंद सपाट राहिला. Sensex, Nifty end flat amid volatility.
मंगळवारी बाजाराची सुरुवात तेजीने झाली. सकाळी रिलायन्स,एचडीएफसी,आणि एल अँड टी या शेअर्समुळे बाजाराला आधार मिळाला. रेकॉर्ड तेजी ची हॅट्ट्रिक झाल्यानंतर मार्केटमध्ये नफावसुली झाली. अडाणी पोर्ट (Adani Ports) ओएनजीसी (ONGC),बजाज फायन्यांस (Bajaj Finance),एसबीआय( SBI) और बजाज ऑटो (Bajaj Auto) हे निफ्टीतले शेअर्स मंगळवारी चांगलेच वाढले. सकाळची तेजी बाजार टिकवू शकला नाही व भारी उतार चढावानंतर बाजार बंद होताना सपाट राहिला. After a positive start, markets erased the intraday gains and ends flat amid volatility.
बुधवारी बाजाराची सुरवात नरमाईने झाली.सकाळी गुंतवणूकदारानी नफावसुली केली त्यामुळे निफ्टीने आपला १५,५०० चा स्तर तोडला. WTI क्रूडने २ वर्षाचा उच्चतम स्तर गाठला तर ब्रेंट क्रूडने ३ महिन्यावरील उच्चतम स्तर गाठला त्यामुळे सकाळी गुंतवणूकदारानी विक्रीचा मारा केला सेन्सेक्स जवळ जवळ५०० अंकांनी घसरला. टेकनॉलॉजी तसेच खाजगी बँकांच्या शेअर्स मध्ये दबाव होता.परंतु शेवटच्या एका तासात बाजारात पुन्हा तेजी पसरली खालच्या स्तरावरून चांगली खरेदी झाली. FMCG प्रॉडक्ट्स बनवणारी अग्रगण्य कंपनी ITC चे तिमाही निकाल थोडा निराशाजनक राहिला त्यामुळे शेअर्स मध्ये २.५%टक्क्यांनी घसरण झाली. रिलायन्सने ३ महिन्याचा उचांक गाठला. Nifty Closes Flat Driven By Late Spurt In RIL. Markets recovered from the day’s low point and ends flat supported by the metal, auto and PSU banking names.
सेन्सेक्स,निफ्टी व मिडकॅप इंडेक्सचा विक्रमी बंद भाव. Markets end at record closing high
गुरुवारी बाजाराची सुरुवात तेजीने झाली. मजबूत विदेशी संकेत,नवीन रुग्णसंख्येतील घट, विविध राज्यातील हळू हळू टाळेबंदी शिथिल करण्याची सुरुवात व त्यामुळे अर्थव्यव्यस्थेत आगामी काळात सुधार होण्याची आशा,आणि शुक्रवारी रिझर्व्ह बँकेचे जाहीर होणारे पतधोरण ह्यामुळे बाजारात जोश होता. पुन्हा एकदा भारतीय बाजारासाठी विक्रमी दिवस ठरला. सेन्सेक्स,निफ्टी,तसेच मिडकॅप इंडेक्सने विक्रमी बंद भाव दिला व त्यासाठी ऑइल अँड गॅस(Oil and Gas) ,इन्फ्रा(Infra) ह्या सेक्टरमधील शेअर्सचे योगदान होते. Sensex, Nifty Rally After Two Sessions Of Pause, Close At All-Time Highs. Markets end at record closing high amid buying seen in the infra, oil & gas, metal and realty names.
रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केल्यानंतर बाजारात घसरण.Sensex, Nifty end marginally lower on status quo policy
आठवडयाच्या शेवटच्या दिवशी रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर बाजार रेकॉर्ड तेजीवरून खाली घसरला. सकाळपासून बाजार सुस्त होता.आर.बी.आय गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी पतधोरण जाहीर केले व त्यात प्रमुख व्याजदर जैसे तेच ठेवण्यात आले. चालू आर्थिक वर्षात देखील करोनाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल असे सांगितले व जीडीपीच्या अंदाजात घट केली.चालू वर्षात विकास दर ९.५ टक्के राहील असे सांगितले. हॉटेल उद्योग तसेच दुसऱ्या क्षेत्रांसाठी (स्पा,सलून तसेच रेस्टॉरंट) अतिरिक्त १५००० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. क्रूड ऑईलचा वाढत्या किंमतीबाबत बाबत दास यांनी चिंता व्यक्त केली. क्रूड ऑईलचा वाढत्या किंमतीबाबत बाबत दास यांनी चिंता व्यक्त केली परंतु समाधानकारक पावसाच्या अंदाजामुळे अर्थव्यवस्था रुळावर येईल अशीही अशा व्यक्त केली. पतधोरणानंतर बाजारात नरमाई दिसली. एच.डी.एफ.सी बँक (HDFC Bank), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), रिलायन्स (Reliance) या शेअर्स मध्ये दबाव होता. अमेरिकेने भारतातून येणाऱ्या ज्वेलरी वरील शुल्क हटवल्याने या सेक्टरमधील शेअर्स मध्ये जोश होता.Markets end marginally lower after Reserve Bank of India maintained status quo and keep its stance accommodative.
(मार्केट मध्ये गुंतवणूक करताना तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा )
जितेश सावंत
शेअर बाजार तज्ञ,
Technical and Fundamental Analyst-Stock Market
jiteshsawant33@gmail.com
JS/KA/PGB
5 Jun 2021