सलग तिसऱ्या आठवड्यात बाजार (Stock Market) तेजीत बंद

 सलग तिसऱ्या आठवड्यात बाजार (Stock Market) तेजीत बंद

मुंबई, दि. 13 (जितेश सावंत): 12 मे रोजी संपलेल्या अत्यंत अस्थिर अश्या आठवड्यात बाजाराने 1 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली.FII ची खरेदी,कंपन्यांचे चांगले तिमाही निकाल,मिश्र जागतिक डेटा यामुळे बाजार वर जाण्यात यशस्वी ठरला. पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष भारताचे 15 तारखेला जाहीर होणारे WPI (wholesale price index) आकडे तसेच 16 तारखेला जाहीर होणारे यूएस व चीनचे Index of Industrial Production आकडे व FII चे आकडे यावर असेल.Technical view on nifty-बाजार ओव्हरबॉट झोन मध्ये आहे. शुक्रवारी निफ्टीने 18314 चा बंद भाव दिला.वरच्या स्तरावर निफ्टी 118389-18435 हे टप्पे गाठू शकेल पण बाजार ओव्हरबॉट असल्याने वरच्या स्तरावर नफावसुली होईल.निफ्टीसाठी 18273-18212-18194हे महत्वपूर्ण स्तर राहतील हे तोडल्यास घसरण वाढेल व निफ्टी 18117-18055-17931-17885-17842-17828-17797-17759 17722 हे स्तर गाठेल.एप्रिलमध्ये किरकोळ महागाई दर 18 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला12 मे रोजी सांख्यिकी मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारताचा किरकोळ चलनवाढीचा दर सलग दुसऱ्या महिन्यात झपाट्याने घसरलामार्च IIP ची वाढ 5.6% वरून 1.1% वर घसरली12 मे रोजी सांख्यिकी मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार,मार्च IIP ची वाढ 5.6% वरून 1.1% वर घसरलीबाजारात जबरदस्त तेजी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजाराने प्रचंड उसळी घेतली.शुक्रवारच्या अमेरिकन बाजारातील तेजीचा असर भारतीय बाजारावर दिसला तसेच गुंतवणूकदार पुन्हा एकदा बाजाराकडे वळताना दिसले.डेटा नुसार यूएस मध्ये आणखी दर वाढीची शक्यता कमी असल्याचे सूचित झाल्याने रियल्टी, बँकिंग आणि ऑटो सारख्या संवेदनशीलक्षेत्रांमधील खरेदीला जोर आला.सेन्सेक्समध्ये जवळपास 800 अंकांची तेजी झाली.तसेच मजबूत तिमाही निकालांमुळे समभागांना आत्मविश्वास मिळाला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 709.96अंकांनी वधारून 61,764.25 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 195.40 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,264.40 चा बंद दिला. Sensex leaps 710 pts after a day’s hiatusबाजाराचा सपाट बंद मंगळवारी बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली व बाजाराने चांगलीच बढत घेतली परंतु शेवटच्या तासातील सेन्सेक्स, निफ्टी मधील विक्रीमुळे सकाळचा नफा पुसला गेला व बाजार सपाट बंद झाला. आगामी काळात जाहीर होणाऱ्या काही आकड्यांमुळे गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिले.यूएस महागाई (inflation data) डेटा जाहीर झाल्यानंतर फेडरल ओपन मार्केट कमिटी (FOMC) पुढील बैठकीची दिशा ठरवेल म्हणून गुंतवणूकदारांनी नफा बुक करण्याचा निर्णय घेतला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 2.92अंकांनी घसरून 61,761.33 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 1.55 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,265.95 चा बंद दिला. Sensex, Nifty end flat after choppy dayसेन्सेक्स हिरव्या रंगात बंद झाला कमजोर जागतिक संकेत असून सुद्धा भारतीय बाजारात बुधवारी खरेदी दिसून आली. तरीदेखील रात्री जाहीर होणाऱ्या यूएस महागाई (inflation data) आकड्यांकडे दलाल स्ट्रीटवर अस्वस्थता स्पष्टपणे दिसत होती.दिवसाच्या अखेरीस झालेल्या काही खरेदीने बाजार वरच्या स्तरावर बंद झाले. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 178.87अंकांनी वधारून 61,940.20 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 49.15 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,315.10 चा बंद दिला. Markets settled higher on Wednesday after volatile trade सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण गुरुवारी, विकली एक्सपायरीच्या दिवशी बाजार कन्सॉलिडेशनच्या मूड मध्ये दिसला. आठवड्याच्या चौथ्या ट्रेडिंग दिवशी जागतिक बाजारातील संमिश्र ट्रेंडमुळे बाजार सुरुवातीची वाढ राखू शकला नाही. बाजार दिवसभर एका विशिष्ठ पातळीभोवती फिरत होता. यूएस चलनवाढीची चिंता कमी झाली तरीही निर्देशांकात तितकीशी वाढ होताना दिसली नाही. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 35.68 अंकांनी घसरून 61,904.52 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 18.10 अंकांची घट होऊन निफ्टीने 18,297 चा बंद दिला. Sensex, Nifty end flat सेन्सेक्स 62 हजारांच्या पुढेआठवड्याच्या शेवटच्या दिवशी कमकुवत जागतिक संकेतांमुळे बाजारात मोठ्या चढ-उतार दिसून आले.बाजारची सुरुवात नकारात्मकतेने झाली. परंतु बँकिंग, वित्तीय आणि ऑटो सेक्टर मधील खरेदीमुळे निर्देशांकाला तोटा कमी करण्यास मदत झाली.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 123.38 अंकांनी वधारून 62,027.90 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 17.80 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,314.80 चा बंद दिला.(लेखकशेअरबाजारतज्ञ,तसेचTechnicalandFundamentalAnalystआहेत)

jiteshsawant33@gmail.com

ML/KA/PGB 13 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *