शिक्षकांच्या न्याय हक्कसाठी मैदानात शरद पवारांनी कसली कंबर*

मुंबई, दि ९
विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाची वाढीव रक्कम मिळावी’, या मागणीसाठी आझाद मैदानावर ‘शिक्षक समन्वयक संघा’ने पुकारलेल्या आंदोलनात शरद पवार सहभागी झाले आणि आंदोलकांशी संवाद साधला.
आज महाराष्ट्राची विधानसभा, महाराष्ट्राची विधान परिषद, देशाची लोकसभा आणि देशाची राज्यसभा यासगळ्या संस्थेमध्ये गेली ५६ वर्ष मी सतत आहे आणि त्यामुळे या प्रशासनाच्या संबंधी तुम्ही काही चिंता करू नका. कसा निर्णय घ्यायचा असतो, कशी तरतूद आणायची असते आणि तुम्हाला ती कशी द्यायची असते हे मला कुणी शिकवायची गरज नाही. ती मागणी पदरात पडेल त्यासाठी आमचा आग्रह राहील अशी माहिती शरद पवार यांनी यावेळी दिली. या आंदोलनामध्ये खासदार निलेश लंके आमदार रोहित पवार आणि इतर मान्यवर मंडळींनी सहभाग नोंदवला. KK/ML/MS