शरद पवार यांचे हेलिकॉप्टर हवेतच खोळंबले, वीस मिनिटे थरार…

रत्नागिरी,दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चिपळूण येथील कार्यक्रम आटपून परतत असताना शरद पवार याचे हेलिकॉप्टर तांत्रिक बिघाडामुळे 20 मिनिट हवेत खोळंबले. दोन-तीन वेळा लँडिंग आणि टेकऑफच्या प्रयत्नामुळे प्रशासनाची मात्र चांगलीच धावपळ उडाली. या हेलिकॉप्टर मध्ये शरद पवार याच्या समवेत प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील, स्वतः पवार आणि त्यांचे नातेवाईक इत्यादी प्रवास करत होते.
क्षमतेपेक्षा जास्त वजन झाल्यामुळे या हेलिकॉप्टरचे टेक ऑफ होत नसल्याचे पायलटच्या लक्षात आले. त्यानंतर हेलिकॉप्टर मधील एका सुरक्षारक्षकाला खाली उतरवण्यात आले. मात्र त्यानंतर हेलिकॉप्टरचे सुरक्षित टेक ऑफ झाल्याने शरद पवार आणि त्यांचे इतर सहकारी नियोजित प्रवासासाठी रवाना झाले.
ML/ ML/ SL
5 Jan. 2025