माविआ वाचवण्यासाठी शरद पवार मैदानात
नवी दिल्ली, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अनावश्यक आणि अपमानकारक वक्तव्य वारंवार करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे अस्तित्व धोक्यात आले आहे, ते वाचवण्यासाठी शरद पवार पुढे सरसावले आहेत.
राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात त्यांच्या विरोधात मोठी नाराजी पसरली आहे, त्यासोबतच आघाडीतील महत्त्वाचा घटक असणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या उध्दव ठाकरे यांनी अशी टीका सहन करणार नाही असा पवित्रा जाहीर केला आहे, यामुळे काँग्रेसला बॅकफूटवर जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. Sharad Pawar in the field to save Mavia
काल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बोलावलेल्या बैठकीवर ठाकरे गटाने बहिष्कार घातला त्यामुळे आघाडीच्या आणि पर्यायाने मोदी , भाजपा विरोधावरील विरोधकांची एकी तुटण्याची भीती निर्माण झाली आहे.
या संपूर्ण पार्श्व भूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पुढे सरसावले असून त्यांनी काल रात्री झालेल्या विरोधकांच्या बैठकीत राहुल गांधी यांना सावरकरांचा विरोध त्रासदायक होऊ शकतो हे पटवून देण्याचा प्रयत्न केला असे समजते , त्याला आज संजय राऊत यांनी ही दुजोरा दिला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर प्रकरणी माघार घ्यावी असा दबाव राहुल गांधी यांच्यावर येत असताना दुसरीकडे रणजित सावरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे, उध्दव ठाकरे यांनी देखील त्यांना माफी मागण्यास सांगावे असा आग्रह सावरकर यांनी पत्रकार परिषदेत धरला आहे.
ML/KA/PGB
28 Mar. 2023