मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे निधन ….

 मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे निधन ….

कोल्हापूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मराठी चित्रपट सृष्टीतील जुन्या जाणत्या आणि ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. त्यांनी अनेक मराठी चित्रपटातून चरित्र अभिनेत्रीच्या भूमिका केल्या होत्या. त्यांच्या खाष्ट सासूच्या भूमिका गाजल्या होत्या‌.

शांता तांबे यांच्या आई पाहिजे, मर्दानी, बाई मोठी भाग्याची, निर्मला मच्छिंद्र कांबळे या चित्रपटांतील भूमिका खूपच गाजल्या.
त्यांचं पार्थिव त्यांच्या मंगळवार पेठ इथल्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. यावेळी अनेक मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. Shanta Tambe, the veteran actress of Marathi cinema, passed away.
आज सकाळी 11 च्या सुमारास पंचगंगा नदी स्मशान भूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ML/KA/PGB
19 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *