शंकर महादेवन यांची लाईव्ह इन कॉन्सर्ट

पुणे, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शंकर महादेवन यांच्या चाहत्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. लवकरच पुण्याच त्यांची लाईव्ह कॉन्स्टर्ट होणार असून त्यात चाहत्यांना ट्रिपल धमाका अनुभवता येणार आहे. कारण शंकर महादेवन यांच्या सह त्यांचे दोन पुत्र सिद्धार्थ आणि शिवम हे देखील यामध्ये आपली कला सादर करणार आहेत. १० मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता कोथरुड येथील काकडे फार्म येथे ही कॉन्सर्ट होणार असून Book My Show वर यासाठी बुकींग सुरु झाले आहे. सकाळ माध्यम समुहाने हा कार्यक्रमाचे आयोजन केले असून लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी हे फायनान्स पार्टनर आहेत. ही अनोखी मैफल अनुभवण्यासाठी लवकरच तुमच्या सिट्स बुक करा.
SL/ML/SL14 April 2025