शनी शिंगणापूर देवस्थानात झाली २४७४ बोगस कर्मचाऱ्यांची भरती…

 शनी शिंगणापूर देवस्थानात झाली २४७४ बोगस कर्मचाऱ्यांची भरती…

मुंबई दि ११ — अहिल्यानगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूर देवस्थानात प्रत्यक्षात २५८ कर्मचारी आवश्यक असताना प्रत्यक्षात २,४७४ बोगस कर्मचारी नेमण्यात येऊन त्यांचा पगार काही कार्यकर्त्यांची बँक खाती उघडून त्यात वर्ग करण्यात आली होती, त्यामुळे सर्व संबंधित लोकांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल आणि देवस्थान समितीच्या बाबतची सुनावणी धर्मादाय आयुक्तांमार्फत करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

याबाबतची लक्षवेधी सूचना विठ्ठल लंघे यांनी उपस्थित केली होती, त्यावर देवयानी फरांदे, सुरेश धस यांनी उपप्रश्न विचारले. लोकसेवक संज्ञा कक्षेत येणाऱ्या सर्व विश्र्वस्तांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात येईल, देवस्थानच्या नावावर भक्तांसाठी बोगस ऍप तयार करून पूजेसाठी कोट्यावधी रुपये खिशात घालण्याच्या प्रकरणी सायबर सेलच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकांकडून चौकशी करून कारवाई करण्यात येईल अशी माहिती देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.

२,४७४ बोगस कर्मचाऱ्यांपैकी ३२७ रुग्णालय, बागकाम, भक्तनिवास , देणगी काउंटरसाठी ३५२, वृक्षसंवर्धनासाठी ८३, शेतीसाठी ६५, पाणीपुरवठा ७९, गोशाळा ८२, स्वच्छता ११८, सुरक्षा ३१५ , प्रसादालय ९७, वाहन विभाग १७६ आणि विद्युत विभागाच्या साठी ७४ अशी बोगस भरती करण्यात आली होती, यापैकी कोणीही या ठिकाणी कार्यरत नव्हते असे चौकशीत आढळून आले आहे अशी माहिती देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *