शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध…

लातूर दि १:– शक्तिपीठ महामार्गच्या विरोधात लातूर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. लातूर तालुक्यातील येळी ढोकी येथे आज मोजणीसाठी आलेल्या महसूल आणि भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी विरोध करीत शेतकऱ्यांनी मोजणीची प्रक्रिया थांबविण्याची मागणी केली.
शेतकऱ्यांनी घेतलेली भूमिका लक्षात घेऊन लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करीत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. शेतकऱ्यांचा मोजणीला असलेला विरोध लक्षात घेऊन प्रशासनाने आजची मोजणीची प्रक्रिया तूर्तास थांबवली. ML/ML/MS