शक्ती कायदा झाला आता अधिक कडक

 शक्ती कायदा झाला आता अधिक कडक

मुंबई दि २५ : शक्ती कायदा आता अधिक कडक करण्यासाठी शक्ती कायद्यात आता बलात्कारित स्त्री सोबतच ॲसिड हल्ल्यातील स्त्रीची ओळख पटू नये यासाठी बंदी. त्यासोबतच समाज माध्यमांवर महिलांसोबतचे अश्लील चित्रण, छायाचित्रे, AI वापरून त्यांची बनावट चित्रे अथवा चित्रफिती तयार करून प्रसारित करणे यावर बंदी घालण्याची तरतूद असणारे विधेयक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत चर्चेअंती मंजूर करण्यात आले.

शक्ती कायद्याला मंजुरी केंद्र सरकारने केलेल्या भारतीय न्याय संहितेच्या लागू करण्याने लांबली होती , त्यामुळे आता हा कायदा मंजूर होण्यासाठी भारतीय न्याय संहितेमध्ये तरतूद नसलेल्या काही कलमांची दुरुस्ती राज्याकडे मागितली होती त्यानुसार या दुरुस्त्या सभागृहात सादर करण्यात आल्या असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

यासोबतच पुरुषांवर होणारे अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी , पुरुषांनाही न्याय मागण्यासाठी व्यवस्था असावी यासाठी देखील कायदा करण्यात यावा अशी मागणी यावेळी चर्चेदरम्यान भास्कर जाधव यांनी केली. संमतीने ठेवलेल्या संबंधांमध्ये काही खटकले तर अनेक वर्षांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला जातो यावर देखील मर्यादा घालावी अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केली, अस्लम शेख, आदित्य ठाकरे यांनी या चर्चेत भाग घेतला.

बलात्कार गुन्ह्याचा गैरवापर करणे, त्याचा हत्यार म्हणून वापर करणे याबाबत गांभीर्याने अभ्यास करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. शक्ती कायद्यातील नऊ तरतुदी आता भारतीय न्याय संहितेमध्ये समाविष्ट झाल्या आहेत, आज मंजूर करण्यात आलेल्या दोन तरतूदी देखील त्यात समाविष्ट कराव्यात अशी विनंती केंद्र सरकार कडे करण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *