श्री तुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवरात्रौत्सव सुरू
उस्मानाबाद, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तुळजाभवानी देवीच्या मंदिरात शाकंभरी नवरात्रोत्सवाला घटस्थापनेने प्रारंभ झाला आहे . सात दिवसांपासून सुरू असलेली देवीची मंचकी निद्रा संपून आज देवी सिंहासनावर विराजमान झाली.
त्यानंतर मंदिर परिसरात विधीवत घटस्थापना करण्यात आली. पौष महिन्यातील अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या या शाकंभरी नवरात्र महोत्सव काळात देवीच्या विविध अलंकार पूजा मांडण्यात येणार आहेत. दररोज रात्री छबिना मिरवणूक आदी धार्मिक होणार आहेत. शाकंभरी नवरात्रोत्सवातील प्रमुख आकर्षण असलेली जलकुंभ यात्रा ३ जानेवारी रोजी असणार आहे.
घटस्थापना निमीत्ताने तुळजाभवानी मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती.
ML/KA/SL
30 Dec. 2022