तुळजाभवानी मंदिरात शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सुरुवात

धाराशिव, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राची कुलस्वामिनी महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपूर्ण पीठ असलेल्या तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सुरुवात आज घटस्थापनेने झाली. तत्पूर्वी आज पहाटे देवीची मंचकीनिद्रा संपवून सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली.
देवीचा हा धाकटा दसरा नवरात्र उत्सव म्ह्णून ओळखला जातो त्यामुळे राज्यभरातून भविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. 25 जानेवारी पर्यंत हा उत्सव चालणार असून या दरम्यान या शाकंभरी नवरात्र महोत्सवाचे वैशिष्ट्य असलेली जलकुंभ यात्रा 22 जानेवारी रोजी सोमवारी संपन्न होत असून देवीच्या विविध अलंकार महापूजा, धार्मिक पूजा होम हवन होणार आहेत. Shakambhari Navratri festival begins at Tuljabhavani temple
ML/KA/PGB
18 Jan 2024