शैक्षणिक वाटप कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि २२
शिवसेना शाखा क्र २२१ तर्फे गिरगाव येथे मोफत शैक्षणिक साहित्य आणि वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शालेय विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून याचा लाभ घेतला. आम्ही दरवर्षी असे सामाजिक शैक्षणिक आणि क्रीडा विषयक कार्यक्रमाचे आयोजन करत असतो तसेच एक भाग म्हणून यावर्षी आम्ही विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाची कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पुढे देखील विद्यार्थ्यांसाठी आम्ही अनेक शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात याची माहिती शिवसेनेचे नेते राजकुमार बाफना यांनी दिली. याप्रसंगी शिवसेनेचे विभाग प्रमुख संतोष शिंदे, उपविभाग प्रमुख विकास मयेकर,शिवसेना नेते पल्लवी सकपाळ व दक्षिण मुंबईतील समस्त शिवसेना युवासेना आणि महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या आयोजन शाखाप्रमुख संतोष घरत यांनी केले होते. KK/ML/MS