शाहूवाडीत निर्माण होणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन
मुंबई, दि ५ :
मुंबई, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध शाहुवाडी तालुक्यामध्ये राज्य सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उभारण्यास तत्वता अंतिम मान्यता मिळाली असून महाराष्ट्र शासनाचे माजी अर्थसचिव सुरेश गायकवाड यांच्या प्रयत्नांना यश आले आहे, सुरेश गायकवाड यांच्या आणि राज्य सरकारच्या अभिनंदन ठराव आजच्या शाहूवाडी तालुका बौद्ध सेवा संघाच्या बैठकीत करण्यात आला. यावेळी सुरेश गायकवाड यांच्यावर अभिनंदन चा वर्षाव करण्यात आला. . शाहूवाडी तालुक्यातील किमान एक एकर जागेवर भव्य भारतीय संविधानकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य सांस्कृतिक भाग उभारण्यासाठी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करण्यात आला. महाराष्ट्र शासन कार्यकाळात सांस्कृतिक भवन उभे राहण्याचे स्वप्न सुरेश गायकवाड यांनी पूर्ण केल्याने त्यांचे अभिनंदन या बैठकीत करण्यात आले. सांस्कृतिक भवनला सरकारकडून तत्वतः मान्यता मिळाल्याने खऱ्या अर्थाने आपल्या सर्व शाहूवाडीतील जनतेची जबाबदारी वाढली आहे. गेल्याच आठवड्यात महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे यांची भेट घेऊन या संदर्भात पाठपुरावा केला आहे. त्यासाठी जनतेच्या 10% सहभागातून किमान एक करोड रुपये उभारल्यानंतर सरकारकडून 15 कोटींचा निधी मंजूर होणार असल्याची माहिती सुरेश गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ही वास्तू उभारण्यासाठी शाहूवाडीकरांना दहा टक्के लोकसहभाग म्हणजे कमी नाही, तालुक्यातील 140 गावातील जनतेने किमान एक एक लाख रुपयांचा निधी दिला तरी ही वास्तू उभी राहण्यास विलंब लागणार नाही, असा आशावाद बौद्ध सेवा संघाचे गिरीश कांबळे यांनी सांगितले. पीडब्ल्यूडी, कोल्हापूर जिल्हा परिषद पुणे विभाग आणि मंत्रालय पर्यंत सर्व पाठपुरावा पूर्ण झाला असून आता शाहूवाडीकरांचे स्वप्न साकार होणार आहे, अशी माहिती प्रा. बापूसाहेब कांबळे यांनी बोलताना दिली. शाहूवाडी ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व बौद्ध बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी एक व्यापक मोहीम राबवली जाणार असल्याचे या बैठकीमध्ये सर्वानुमते ठरविण्यात आले, अधिक माहितीसाठी प्रा. बापूसाहेब कांबळे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.KK/ML/MS