शाहरूख खान दर महिन्याला ‘इतके’ लाख भरून भाड्याच्या घरात राहणार, ‘मन्नत’ का सोडणार वाचा?

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान या वर्षाच्या अखेरीस आपल्या कुटुंबासह ‘मन्नत’ बंगला सोडणार आहे. एवढा मोठा बंगला सोडून शाहरूख पाली हिलमधील महिन्याला २४ लाख भाडे असलेल्या फ्लॅटमध्ये कुटुंबासह राहणार आहेत. याचं कारण म्हणजे ‘मन्नत’चे नुतनीकरण होणार आहे. ते सुरू झाल्यावर, शाहरूख वांद्रे येथील पाली हिलमधील आलिशान अपार्टमेंटमध्ये राहायला जाईल. शाहरुखने हे अपार्टमेंट 3 वर्षांसाठी भाड्याने घेतले आहे. मात्र, नुतनीकरण पूर्ण झाल्यानंतर ते ‘मन्नत’मध्ये पुन्हा राहायला येण्याची शक्यता आहे.