शाहरुखच्या ‘डंकी’ चित्रपटात या ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीची भूमिका

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॉलिवूडच्या किंग खानचा आज ५८ वाढदिवस आहे.शाहरुखने आपल्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास गिफ्ट दिलं आहे. शाहरुखच्या बहुप्रतिक्षित ‘डंकी’चा टीझर आज रिलीज झाला आहे. किंग खानच्या या आगामी चित्रपटामध्ये मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री दिसत आहे.अवघ्याच काही सेकंदाच्या टीझरमध्ये अभिनेत्रीची जोरदार चर्चा होते. चित्रपटामध्ये शाहरुखसोबत मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष दिसणार आहेत.
ज्योती सुभाष यांनी चित्रपटामध्ये आजीचे पात्र साकारलेय. शाहरुखच्या मित्राची आई त्याच्या आजीची शपथ घ्यायला सांगते. टीझरमध्ये ज्योती सुभाष म्हणतात, अरे सारखी माझीच काय शपथ घेता? आणि पुढे त्या आजीचं निधन झालेलं दिसतं. या धम्माल कॉमेडी प्रसंगाने सर्वच लोटपोट हसताना दिसत आहे.
डंकी या चित्रपटामध्ये मुख्य भुमिकेत शाहरुख खान, तापसी पन्नू, दिया मिर्झा, बोमन इराणी अशी दमदार कलाकारांची स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. तर चित्रपटामध्ये विकी कौशल कॅमिओ करणार आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ चित्रपट येत्या २१ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
SL/KA/SL