मराठवाडा विकासाला प्राधान्य देणार, शाह यांचे आश्वासन

 मराठवाडा विकासाला प्राधान्य देणार, शाह यांचे आश्वासन

नवी दिल्ली, 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार सर्व प्रकारची मदत करेल.मराठवाडा विकासाला प्राधान्य देणार,असल्याचे आश्वासन केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी खासदार अजित गोपछडे यांना मंगळवारी दिले. खासदार गोपछडे यांनी शाह यांच्या सोबत भेट घेऊन विशेष चर्चा केली. तसेच मराठवाडा विभागातील विविध समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान, मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारच्या मदतीची मागणी करण्यात आली.

दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सहकार क्षेत्रात प्रोत्साहन देण्यात यावे. केंद्र सरकारकडून मराठवाड्यातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य आणि अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणी देखील करण्यात आली. सहकारी संस्था व दुग्ध व्यवसायाच्या विस्तारासाठी विशेष योजना राबवण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी बायोगॅस प्रकल्प सुरू करून त्यांना स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी प्रोत्साहन देणे. केंद्र सरकारच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणावर बायोगॅस व सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात यावे.

मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी अतिरिक्त निधी आणि धोरणात्मक पातळीवर निर्णय घेण्याचे देखील आवाहन करण्यात आले. कृषी संशोधन केंद्रे स्थापन करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. शैक्षणिक संस्थांचा विकास आणि तांत्रिक शिक्षणाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने विशेष निधी उपलब्ध करून द्यावा. मराठवाड्यात अत्याधुनिक आरोग्यसेवा केंद्रे आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालये उभारण्यात यावे.

नांदेडहून मुंबईसाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी, ज्यामुळे प्रवाशांना जलद व सोयीस्कर प्रवासाचा लाभ मिळेल.
मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीसाठी औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्याची मागणी.नांदेड येथे सोयाबीन इंडस्ट्री स्थापन करून स्थानिक शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळावा. विमान वाहतूक विकास योजनेअंतर्गत नवीन उड्डाणे सुरू करण्याची विनंती सुद्धा केली.

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी या सर्व मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेतली असून, केंद्र सरकारकडून मराठवाड्याच्या विकासासाठी आवश्यक सहकार्य आणि पाठबळ देण्यात येईल, असे आश्वासन दिले असल्याचे गोपछडे यांनी सांगितले.
मराठवाडा विकासासाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

VB/ML/SL
25 March 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *