शाडू मातीच्या 2000 मोदकांच्या प्रसादात भाज्यांची बीजे
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महानगरपालिका पर्यावरण विभाग तसेच एसएसटी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव कालावधीत विद्यार्थ्यांनी गणपतीचा प्रसाद म्हणून सुमारे 2000 बीजमोदक तयार केले आहेत. बीज मोदकांच्या बॉक्स वर असलेल्या क्यूआर कोडमध्ये विविध भाज्यांचे नाव असून आयुक्त विकास ढाकणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे.
उल्हासनगर महानगरपालिकेने गणेशोत्सवात पर्यावरण पूरक अशा शाडू माती पासून गणपती बाप्पाच्या मूर्ती तयार करण्याची हाक दिली होती. अशातच एसएसटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरस्वानी यांची संकल्पना आणि महानगरपालिका पर्यावरण विभागाच्या विद्यमाने घरगुती वापरामध्ये खाण्यात येणाऱ्या भाज्यांची बीजमोदके तयार करण्याचे काम विद्यार्थ्यांनी पार पाडले
PGB/ML/PGB
17 Sep 2024