‘लोन ॲप’वरुन विळखा ‘सेक्सटॉर्शन’

 ‘लोन ॲप’वरुन विळखा ‘सेक्सटॉर्शन’

 मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कागदपत्रांच्या अटींविना झटपट कर्ज देण्याची जाहिरातबाजी करणाऱ्या ‘लोन ॲप’वरून ‘सेक्सटॉर्शन’ करण्याच्या घटना पुन्हा वाढल्या आहेत. मुंबईत दोन दिवसांत गिरगावच्या चिरा बाजार, पवई आणि ओशिवरा परिसरात २५ ते ३० वर्षांच्या तरुणी ‘सेक्सटॉर्शन’च्या बळी ठरल्या आहेत. ‘मॉर्फिंग’ केलेले अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी या तरुणींना देण्यात आली. या तरुणींच्या तक्रारीवरून स्थानिक पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदविण्यात आले.

अंधेरी पूर्वेतील एका २५ वर्षीय तरुणीने इंस्टाग्रामवर ‘लोन ॲप’ची जाहिरात पाहिली. त्यातील लिंकवर ‘क्लिक’ करून तिने ओळखपत्र आणि वैयक्तिक माहितीचा इतर तपशील भरला. त्यानंतर तिच्या बँक खात्यावर १८०० रुपये आले. तिला अधिक रक्कम कर्ज म्हणून हवी होती. त्यामुळे तिने या रकमेची तत्काळ परतफेड केली. परतफेड करूनही ‘ॲप’च्या प्रतिनिधींकडून पैसे पाठविण्यासाठी तगादा सुरू होता. या तरुणीने पैसे पाठविण्यास नकार देताच ॲपच्या कथित प्रतिनिधीने तिचे अश्लिल फोटो आणि व्हिडिओ नातेवाइकांना पाठवले. तरुणीने पैसे न पाठवता याबाबत पवई पोलिस ठाण्यात तक्रार केली.

‘Sextortion’ from ‘Loan App’

ML/ML/PGB
11 Apr 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *