शिवडीत झाले स्वच्छ शिवडीसुंदर
शिवडी अभियानाची सुरुवात
मुंबई, दि २५
शिवडी येथील टी जे रोडवरील हाइराइज सोसायटी यांनी एकत्र येऊन पोलीस अधिकारी, ट्राफिक पोलीस अधिकारी व बीएमसी एफ साऊथ वार्ड अधिकारी यांचा शिवडी येथील हाय राईस रहिवाशांकडून भव्य नागरी सत्कार केला. तसेच स्वच्छ शिवडी सुंदर शिवडी या अभियानाची सुरुवात पोलीस बांधवांच्या हस्ते करण्यात आली.
शिवडी टी जे रोड येथील रस्त्यावर झालेले फेरीवाल्यांचे अतिक्रमण, अनधिकृत पार्किंग, अनधिकृत मच्छी बाजार याविरुद्ध शिवडी येथील जवळजवळ 11 हाय राईझ सोसायटी यांनी एकत्र येऊन स्थानिक पोलीस, आरटीओ व बीएमसी अधिकाऱ्यांना यावर जर त्वरित कारवाई न केली तर निषेध आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. पण संबंधित पोलीस, ट्राफिक व बीएमसी अधिकाऱ्याने त्वरित कारवाई करून अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत पार्किंग हटवले आणि रस्ता पूर्णपणे मोकळा केला. आणि निषेध आंदोलन रद्द करून त्याऐवजी संबंधित अधिकाऱ्यांचा सत्कार करण्याचे ठरले.
या कार्यक्रमांमध्ये असिस्टंट कमिशनर पोलीस श्री सचिन कदम, सीनियर पोलीस इन्स्पेक्टर श्री विनोद तावडे, सीनियर पोलीस इन्स्पेक्टर ट्राफिक श्री सरदार नाळे, तसेच उपस्थित सर्व पोलीस, आरटीओ अधिकारी सहकारी वर्गाचा भव्य सत्कार केला.
या कार्यक्रमात स्वच्छ शिवडी सुंदर शिवडी, शिस्तबद्ध शिवडी कटिबद्ध शिवडी या अभियानाची सुरुवात करण्यात आली. या अभियानाचे अनावरण एसीपी सचिन कदम, विनोद तावडे, सरदार नाळे यांच्या हस्ते झाले.
सदर 11 सोसायटीतील प्रतिनिधींनी या कार्यक्रमानंतर आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली आहे आणि पुढे हे असोसिएशन रजिस्टर करून शिवडी सुंदर व सुशोभित करण्यासाठी पुढील कार्यक्रम हातात घेण्यात येतील असे समाजसेवक राजन घाग यांनी सांगितले.KK/ML/MS