पुढील पाच दिवसांसाठी तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा
मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आठवड्याभरापूर्वीच मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. त्यातच बंगालच्या उपसागरात रेमल चक्रीवादळ थैमान घालत आहे. देशभर उष्णतेचा पारा ४० पार सहज जात आहेत. त्यामुळे देशभरातील नागरीक हवालदिल झाले आहेत. त्याच आज हवामान खात्याने एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. पुढील ४-५ दिवसांत पश्चिम भारताच्या मैदानी भागात उष्णतेची तीव्र लाट कायम राहण्याची शक्यता आहे. पश्चिम हिमालयीन क्षेत्र, पंजाब, हरियाणा, राजस्थान मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगढ या प्रदेशांमध्येही या काळात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ आणि गुजरात प्रदेशातही उष्णतेच्या लाटा पसरण्याची शक्यता आहे. या भागांतील तामपान ४४ ते ४८ अंश या दरम्यान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान उष्णतेचा हा धोका लक्षात घेऊन विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. दरम्यान विदर्भ आणि मराठवाडा वगळता महाराष्ट्राच्या अन्य भागात येत्या आठवड्यात उष्ण हवामानासह अवकाळी वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दिवसभर उष्णता आणि संध्याकाळी पाऊस असे संमिश्र हवामान उर्वरीत महाराष्ट्रात असण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
SL/ML/SL
26 May 2024