आज दिवसभरात Air India ची सात उड्डाणे रद्द
मुंबई: मंगळवारी Air India ने सात उड्डाणे रद्द केल्याने अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. ही रद्द झालेली उड्डाणे तांत्रिक अडचणी, विमान उपलब्धतेच्या समस्या आणि सुरक्षेच्या अतिरिक्त तपासण्यांमुळे प्रभावित झाली आहेत.
रद्द झालेल्या उड्डाणांची यादी Air India ने खालील उड्डाणे अचानक रद्द केली:
🔹 दिल्ली – पॅरिस (AI-143)
🔹 अहमदाबाद – लंडन गॅटविक (AI-159)
🔹 दिल्ली – व्हिएन्ना (AI-153)
🔹 बंगळुरू – लंडन (AI-133)
🔹 दिल्ली – दुबई (AI-915)
🔹 लंडन – अमृतसर (AI-170)
येत्या काही दिवसांत आणखी उड्डाणे रद्द होण्याची शक्यता Air India च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या देखील अमृतसर – लंडन गॅटविक (AI-169), दिल्ली – झ्युरिच (AI-151) आणि दिल्ली – मेलबर्न (AI-308) ही उड्डाणे रद्द होण्याची शक्यता आहे.
Air India ने दिलेल्या माहितीनुसार, या उड्डाणे रद्द करण्यामागे अनेक कारणे आहेत. DGCA ने सुरक्षा तपासणीसाठी दिलेल्या नव्या आदेशांमुळे काही उड्डाणे रोखण्यात आली आहेत. याशिवाय तांत्रिक अडचणींमुळे काही विमानांना वेळेवर उड्डाण घेता आले नाही.
प्रभावित प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था रद्द झालेल्या उड्डाणांच्या प्रवाशांना पूर्ण परतावा, मोफत पुनर्नियोजन आणि हॉटेल सुविधा देण्यात आली आहे. अनेक प्रवाशांनी याबद्दल सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. काही प्रवाशांनी वेळेवर पर्याय न मिळाल्याने त्यांच्या योजनांना मोठा फटका बसल्याचे सांगितले.
ही परिस्थिती Air India च्या सुरक्षितता उपाययोजनांचा भाग असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. विमान कंपनीने प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला असल्याची ग्वाही दिली आहे.