सेवानिवृत्त आयएनएस गुलदार नौका विजयदुर्ग बंदरात दाखल

 सेवानिवृत्त आयएनएस गुलदार नौका विजयदुर्ग बंदरात दाखल

सिंधुदुर्ग, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आयएनएस गुलदार ही सेवानिवृत्त युद्धनौका महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला विजयदुर्ग बंदरापर्यंत आणण्यात अखेर यश मिळाले आहे . कारवार येथील नौदलाच्या तळावरून गुलदार नौका विजयदुर्ग बंदरात येऊन स्थिरावली आहे .या ठिकाणी नौकेवरील पर्यावरणाला हानी पोहोचवणारी द्रव्य आणि वस्तू काढून टाकण्यात येतील.

नौकेच्या संपूर्ण स्वच्छतेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी जवळील निवती रॉक जवळ गुलदार नौकेला समुद्रात बुडवण्यात येणार आहे . कालांतराने त्यावर तयार झालेले रिफ आणि कोरल पाहण्यासाठी पर्यटकांना पारदर्शक असलेल्या पाणबुडीतून नेण्यात येणार आहे. स्कुबा डायव्हिंग करून सुद्धा याचा आनंद घेता येणार आहे समुद्र विज्ञान आणि कोरलच्या अभ्यासकांसाठी आयएनएस गुलदार यानंतर अभ्यास केंद्र ठरणार आहे.

तब्बल 81 मीटर लांबीची आयएनएस गुलदार ही युद्धनौका युद्धामध्ये तसेच शांततेच्या काळात आपदग्रस्तांना मदतीसाठी वापरण्यात येत होती. सेवानिवृत्तीनंतर देखील गुलदार आता पर्यटकांच्या आणि अभ्यासकांच्या सेवेत रुजू होऊन चिरंतन सेवा देणार आहे.

ML/ML/PGB
16 March 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *