‘महिला आयोग आपल्या दारी’मध्ये २६९ तक्रारींचा निपटारा

 ‘महिला आयोग आपल्या दारी’मध्ये २६९ तक्रारींचा निपटारा

‘महिला आयोग आपल्या दारी’मध्ये २६९ तक्रारींचा निपटारा

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सातारा जिल्ह्यात महिला बचत गटांचे जाळे चांगले विणले असून यातून सबलीकरणही झाले आहे. त्यामुळे साताऱ्यातील हे काम राज्यातही राबवावे अशी शिफारस शासनाकडे करणार आहे. त्याचबरोबर महिला आयोग आपल्या दारी उपक्रमांत २६९ तक्रारी आल्या. सर्वाधिक वैवाहिक आणि काैटुंबिक समस्यांच्या होत्या. या सर्व तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत महिलांच्या तक्रारींबाबत सुनावणी झाली. त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली होती.

Settlement of 269 complaints in ‘Women’s Commission Apna Dari’

ML/ML/PGB
28 Jun 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *