भावना गवळी आणि संजय राठोड यांच्यात दिलजमाई

 भावना गवळी आणि संजय राठोड यांच्यात दिलजमाई

मुंबई, दि. २८ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशिमच्या खासदार भावना गवळी आणि मंत्री संजय राठोड यांच्या कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्र्यांची एकत्र बैठक काल रात्री होऊन त्यात उमेदवारीवर तोडगा निघाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

वाशीम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून खासदार भावना गवळी यांची उमेदवारी जाहीर करावी या मागणीसाठी वाशीम यवतमाळ मधील शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रात्री मुंबईत दाखल झाले होते त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राठोड आणि भावना गवळी यांच्यासह कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक घेत लवकरच उमेदवारी जाहीर करू असं आश्वासन दिले आहे. त्यामुळे भावना गवळी यांच्या उमेदवारीचा मार्ग सुकर झाला असून संजय राठोड आणि भावना गवळी यांच्यातील वाद मिटवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आल्याचं सांगितलं जात आहे.

ML/ML/SL

28 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *