केरळमध्ये साखळी बॉम्बस्फोट, मुंबईत हाय अलर्ट

थिरुवनंतपुरम्, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज सकाळी केरळ केरळमध्ये आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास कन्व्हेन्शन सेंटरमध्ये बॉम्बस्फोट झाला. एका मागोमाग एक साखळी स्फोटांनी केरळ राज्यात भितीचे वातावरण पसरले आहे. यहुदी समाजाच्या प्रार्थनास्थळामध्ये हे साखळी बॉम्बस्फोट झाले. यावेळी तेथे २५०० लोक उपस्थित होते. या बॉम्बस्फोटात एका नागरिकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. सध्या 35 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
प्राथमिक तपासात घटनास्थळावरून स्फोटासाठी वापरण्यात आलेल्या बॅटरी, वायर आणि इतर उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये टिफीन बॉक्समध्ये बॉम्ब ठेवून आयईडीच्या साहाय्याने स्फोट घडवण्यात आलल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी चर्चा केली. संवादादरम्यान परिस्थितीचा आढावा घेतला.
केरळमध्ये झालेल्या स्फोटनंतर मुंबईतही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळमध्ये आज सकाळी झालेल्या सीरीयल बॉम्ब ब्लास्टचा घटनेनंतर मुंबईमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईच्या कुलाबा परिसरात खाबड हाउस इमारतीमध्ये यहुदी समाजाचे लोक मोठ्या संख्येने राहतात. 26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळीही दहशतवाद्यांनी खाबड हाउस इमारतीवरला लक्ष्य केलं होतं. त्यानंतर नेहमी या इमारतीमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असतो, मात्र आज केरळमध्ये झालेल्या सीरीयल बॉम्बब्लास्टच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी खाबड हाउस इमारतीच्या गल्लीमध्ये मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. खाबड इमारतीच्या गल्लीमध्ये जाणारा एक-एक गाडीचा आणि नागरिकांचा पोलीस कसून चौकशी करत आहे.
SL/KA/SL
29 Oct. 2023