लवकरच येणार ‘RRR’ चा सिक्वेल
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एस. एस. राजामौली दिग्दर्शित RRR या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात इतिहास रचला आहे. बेस्ट ओरिजिनल साँग (सर्वोत्कृष्ट मूळ गाणं) विभागात ऑस्कर पुरस्कार पटकावणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच येणार आहे. या इंटरनॅशनल अवॉर्ड फंक्शनमध्ये स्वत: एसएस राजामौली यांनी एका मुलाखतीदरम्यान चित्रपटाच्या सिक्वेलची पुष्टी केली आहे.
एसएस राजामौली म्हणाले की, चित्रपट प्रदर्शित झाल्यावर लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपट जागतिक स्तरावर गाजल्यानंतर आम्हाला या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याची कल्पना आली. यासाठी विविध कल्पना होत्या. परंतु त्यापैकी कशावरही मी समाधानी नव्हतो. काही आठवड्यांपूर्वी मी माझ्या वडिलांशी आणि माझ्या चुलत भावाशी याबद्दल चर्चा करत होतो. मात्र, स्क्रिप्ट पूर्ण होईपर्यंत आम्ही त्यावर जास्त बोलू शकत नाही, पण आमचे काम सुरू आहे हे नक्की. ऑस्कर जिंकल्याने आता आरआरआर सिक्वेल स्क्रिप्टला वेग येईल.
2022मध्ये नाटूनाटू गाण्यानं सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला. नाटूनाटूची हुक स्टेप सोशल मीडियावर चांगलीच हिट झाली होती. नाटू नाटू या गाण्याला काही दिवसांआधीच गोल्डन ग्लोब अवॉर्ड देखील मिळाला.
SL/KA/SL
14 March 2023