सेन्सेक्स जवळपास २६०० अंकांनी गडगडला, शेअर बाजार घसरण्याची कारणे काय ?
मुंबई दि. ५(जितेश सावंत):
जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीचा फटका जगभरातील बाजारावर पडताना दिसला. आशियाई बाजार मोठ्या प्रमाणात कोसळले. भारतीय बाजार देखील मोठ्या प्रमाणात गडगडले. जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाली. सेन्सेक्स जवळपास 2600 अंकांनी गडगडला आणि निफ्टी 800 अंकांची घसरण झाली. बाजारात चौफेर विक्री.होताना दिसली.
आज शेअर बाजार घसरण्याचे कारण?
- अमेरिकेतील अत्यंत खराब जॉब डेटानंतर, देशात मंदीची भीती बळकट झाली आहे, ज्यामुळे शेअर बाजाराच्या सेंटीमेंट वर परिणाम झाला. Recession Fears .
- चीन आणि युरोप आधीच मंदीशी झुंजत आहेत आणि वाढत्या भू-राजकीय तणावामुळे बाजारांवर आणखी दबाव आला.
- अमेरिकन आर्थिक वाढ मंदावण्याच्या भीतीमुळे, जागतिक बाजारातील विक्रीचा परिणाम भारताच्या शेअर बाजारावरही झाला.
4 BoJ धोरण.
BoJ Policy
बँक ऑफ जपानने बुधवारी आपला बेंचमार्क व्याजदर वाढवल्यामुळे जपानचा बाजार देखील संघर्ष करत आहे. या वाढीमुळे जपानी येनचे मूल्य यूएस डॉलरच्या तुलनेत जास्त झाले.
yen carry trade unwind
5 इराण-इस्रायल तणाव. Iran-Israel tensions
इराण, हमास आणि हिजबुल्लाहने इस्रायलने हमास प्रमुख आणि हिजबुल्लाहच्या लष्करी प्रमुखाच्या हत्येचा बदला घेण्याची शपथ घेतल्याने मध्यपूर्वेतील तणाव वाढला. मध्य पूर्वेतील तणावामुळे तेलाच्या किमती वाढतील.
बाजाराला पुढील संकेत देण्यासाठी गुंतवणूकदार कमाईचा हंगाम, अर्थसंकल्प आणि यूएस फेडरल रिझर्व्हकडे पाहत होते. तथापि, या सर्व गोष्टी झाल्यामुळे, बाजारपेठेत गती वाढवू शकेल अशा कोणत्याही नवीन ट्रिगर्सचा अभाव आहे.
त्याचप्रमाणे बाजारचे मूल्य हे वाढलेले असल्याने बाजार गडगडला. Absence of fresh near-term triggers
निफ्टी 24,074 ह्या बजेटच्या दिवसाच्या नीचांकी पातळीपर्यंत खाली घसरला. Nifty slips below Budget day low of 24,074.अस्थिरता निर्देशांक 50% पेक्षा जास्त वाढला, ऑगस्ट 2015 नंतरची सर्वात मोठी एक दिवसीय वाढ Volatility Index surges more than 50% as market extends losses, biggest single-day surge since August 2015
गुंतवणूकदारानी पडझडीचा फायदा उचलावा आणि दीर्घकालीन गुंतवणूक करावी
(लेखक शेअरबाजार तसेच सायबर कायदा तज्ञ,आहेत)
jiteshsawant33@gmail.com
js/ ML/ SL
5 August 2024