सेन्सेक्स निफ्टीने गाठला विक्रमी उच्चांक. अर्थसंकल्प सादर होईपर्यंत बाजाराचा वर जाण्याचा प्रयत्न
मुंबई, दि. 14 (जितेश सावंत) : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजाराने नवा विक्रमी स्तर गाठला. शुक्रवारी आयटी शेअर्सच्या भक्कम जोरावर शेअर बाजारात तेजी दिसून आली. दिवसभरात बाजाराने विक्रमी उच्चांक गाठला. सेन्सेक्स 80900 च्या जवळ तर निफ्टी 24600 च्या जवळ पोहोचला. BSE सेन्सेक्सने 1.24 टक्क्यांनी वाढ घेऊन 80,893.51 चा विक्रमी उच्चांक गाठला, तर निफ्टीने 1.13 टक्क्यांनी वाढ घेऊन 24,592.20 चा नवा उच्चांक गाठला. At the end of the week, the market reached a new record high. On Friday, the stock market experienced a surge due to the strength of IT shares.
सलग सहाव्या आठवड्यात बाजाराने वाढ नोंदवली
पहिले चार दिवस consolidation झाल्यावर भारतीय बाजाराने 12 जुलै रोजी संपलेल्या आठवड्याच्या शेवटच्या सत्रात जोरदार वाढ नोंदवली. परदेशी गुंतवणूकदारांकडून झालेली खरेदी,मान्सूनची चांगली प्रगती,तिमाही निकालांची चांगली सुरुवात,यूएस मधील अपेक्षेपेक्षा कमी झालेली महागाई आणि त्यामुळे वर्षाच्या अखेरीस फेडद्वारे दर कपातीची निर्माण झालेली आशा या सगळ्याचा एकत्रित परिणाम बाजारावर होताना दिसला. The Indian market saw a strong rally in the last session of the week ending July 12.This was attributed to increased buying by foreign investors, positive progress in the monsoon, and a promising start to quarterly results. Additionally, lower-than-expected inflation in the US sparked hope for a rate cut by the Fed by the end of the year.
CPI Inflation in June Rises To 4-Month High of 5.08%, IIP Growth Jumps To 5.9%
येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष तिमाही निकाल (Q1earnings)पॉवेल यांचे भाषण (Powell speech),युरोपियन सेंट्रल बँकेची 18 जुलै रोजी होणारी बँकेची (ECB decision), China GDP अश्या महत्वाच्या गोष्टींकडे राहील.
केंद्रीय अर्थसंकल्प 2024 यावर्षी 23 जुलै रोजी सादर होणार आहे.आणि तो सादर होईपर्यंत बाजार वर जाण्याचा प्रयत्न करेल.
Technical view on nifty-
शुक्रवारी निफ्टीने 24502.2 चा बंद भाव दिला. निफ्टीसाठी
24449-24433- 24414-
24388-24331-24281-24240 हे महत्वाचे सपोर्ट
(Support) आहेत.हे तोडल्यास निफ्टी 24193-24141-24123-24056-23992-23985-23868-23805-23868-23754-
23721-2367-23577 हे स्तर गाठेल. वरच्या स्तरावर निफ्टीसाठी 24619-24736-
24880 हे रेसिस्टन्स (Resistance) ठरतील.
मार्केट ओव्हर बॉट झोन मध्ये असल्याने गुंतवणूकदारानी सावध पवित्रा घेण्याची गरज आहे.
( लेखक शेअरबाजार तसेच सायबर कायदा तज्ञ,आहेत )
Sensex Nifty hits record highs. Markets try to rally ahead of budget presentation
ML/ML/PGB
14 July 2024